• उद्यमबाग पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

दोन अट्टल दुचाकीचोराना जेरबंद करून सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात  बेळगावातील उद्यमबाग पोलिसांना यश आले आहे. 
उद्यमबाग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना मिळालेल्या धागेदोऱ्यांवरून पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेतहैदरअली मुस्लिमअली शेखराएपीजे अब्दुल कलाम कॉलनीपिरनवाडी आणि मोदीन उर्फ नदीम शमशुद्दीन टोपीगाररासेकंड क्रॉसअमन नगरन्यू गांधी नगरबेळगाव अशी अटक केलेल्या बाईक चोरांची नावे आहेतत्यांच्याकडून हिरो स्प्लेंडर,यामाहा एफ झेडऍक्टिव्हाऍक्सेसडिओ आदी कंपन्यांच्या एकूण ७ दुचाकी जप्त करण्यात आल्याआहेतत्यांची एकूण किंमत १ लाख ९५ हजार रुपये आहे
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक रामप्पा बिरादारहवालदार श्रीमती एम.पीकदमपोलीस कर्मचारी आयएसपाटीलएचएसहादीमनीबीबडनूरएसकर्कीआयएमचवलगी आदींनी या कारवाईत भाग घेतला.