बैलहोंगल / वार्ताहर
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार दि. १ जानेवारी रोजी रात्री दगडाने ठेचून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. (अनिगोळ ता. बैलहोंगल) येथे ही घटना घडली. मंजुनाथ सुंगर (वय ४५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजय हिरेमठ हा या प्रकरणातील संशयित आरोपी आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दारूच्या नशेत मंजुनाथ आणि अजय चे भांडण झाले. त्यामुळे झालेल्या वादावादीत अजयने मंजुनाथला दगडाने ठेचून गंभीर जखमी केल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर अजय फरार झाला. घटनेनंतर स्थानिकांनी बैलहोंगल पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी बैलहोंगल येथील सरकारी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणाची नोंद बैलहोंगल पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments