- ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात
चिक्कोडी / वार्ताहर
चिक्कोडी उपनिबंधक कार्यालयावर धाड घालून लोकायुक्त पोलिसांनी उपनिबंधकांना ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. जी. पी. शिवराजू असे लोकायुक्त पोलिसांनी अटक केलेल्या उपनिबंधकाचे नाव आहे. जमिनीचे खाते बदलण्यासाठी शिवराजू याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती.
शिवराजूने पैशांची मागणी केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर आज लोकायुक्त विभागाच्या पोलीस प्रमुख यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 Comments