सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीला गांधीग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हिंडलगा ग्रा. पं. चे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या पुढाकाराने गावात स्वच्छता तसेच अन्य सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दरवर्षी गांधी जयंतीच्या आधी हा पुरस्कार जाहीर करून गांधी जयंतीदिनी प्रदान करण्यात येतो. मात्र काही कारणामुळे गेल्यावर्षी ते जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदा जानेवारीत २०२२-२३ चे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एका ग्राम पंचायतीला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. बेळगाव तालुक्यात हिंडलगा ग्रामपंचायतीची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.