कल्लेहोळ / गोपाळ पाटील
कल्लेहोळ (ता. बेळगाव) गावातून ९०,००० रु.किंमतीची दुभती म्हैस अज्ञाताने चोरट्याने चोरून नेली. आज मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण हरिभाऊ साळुंखे (वय ५५, रा. मुळगाव कुंभारी ; जि. लातूर) हे आपल्या परिवारासह कल्लेहोळ गावामध्ये लोहारी कामासाठी दोन महिने अगोदर स्थायिक झाले आहेत. उघड्या जागेवर ते तंबू ठोकून वास्तव्याला आहेत. सोमवारी रात्री दहा वाजता म्हशीला चारा-पाणी करून ते झोपी गेले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सुमारे ९०,००० रु. किंमतीची म्हैस चोरून नेली. आज सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर नजीकच्या परिसरात सर्वत्र म्हशीचा शोध घेण्यात आला परंतु अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तरी म्हैस आढळल्यास 917796321815 या क्रमांकाशी संपर्क साधावा.
0 Comments