• महापौर - उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर
  • नगरविकास खाते व शहर विकास सचिवालयाकडून घोषणा
 

बेळगाव / प्रतिनिधी 

नगर विकास खाते व शहर विकास सचिवालयाने कर्नाटक राजपत्राद्वारे राज्यातील बेळगावसह बळळारी, बेंगळूर, दावणगिरी हुबळी-धारवाड, कलबुर्गी, मंगळूर, म्हैसूर , शिमोगा, तुमकुर आणि विजयपूर या महानगरपालिकांच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण सोमवारी जाहीर केले. त्यानुसार २१ व्या कार्यकाळासाठी बेळगाव महापौर पद सामान्य महिला आणि उपमहापौर पद मागासवर्गीय महिला 'ब' श्रेणी असे आरक्षित आहे.


बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असले तरी निवडणूक कधी होणार याची घोषणा प्रादेशिक आयुक्त करणार आहेत. दरम्यान उद्या ११ तारखेला, महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता जास्त आहेआमदार अभय पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच   ९ तारखेलाच तारीख निश्चित केली जाईल, असे सांगितले होते, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या दिवशीच प्रत्यक्ष निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.