बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी निश्चित केल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ. एम. जी. हिरेमठ यांनी जाहीर केले आहे.
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास सहा वर्षे उलटले आहे. मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त काही लागत नव्हता. यासंदर्भात आमदारांनी देखील दोन वेळा निवडणूक होणार असल्याचे सांगितले होते. नुकतेच ३१ जानेवारीला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून ती आता 6 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ. महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे.
महापौर पदासाठी सामान्य महिला तसेच उपमहापौर पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक आयुक्तांनी दिली आहे.
0 Comments