बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आज स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी ८ वा.जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी  आपले विचार मांडले तसेच उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंडी, महसूल अधिकारी एस. एम. परगी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.