• दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने अपघात
  • विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील घटना  

विजयपूर / वार्ताहर

दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकीची रस्त्याकडेला असलेल्या संरक्षक कठड्याला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह अन्य एक जण जागीच ठार झाला.  विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील तडवलगा गावानजीक आज दुपारी ही घटना घडली. प्रभू ख्यायगोळ (वय 34), रामगौंड ख्यायगोळ (वय 23) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.


याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी प्रभू व रामगौंड दुचाकीवरून तडवलग्याच्या दिशेने निघाले असता, तडवलगा गावानजीक प्रभू याचा दुचाकीवरील  ताबा सुटल्याने भरधाव दुचाकीची रस्त्या नजीकच्या रेलिंगला धडक बसून हा अपघात घडला.


अपघातानंतर स्थानिकांनी होरती पोलीस स्थानकाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद होरती पोलीस स्थानकात झाली असून  पोलीस अधिक तपास करत आहेत.