- कोंडसकोप्प येथे सकल मराठा समाजाचे आंदोलन
- आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद
- हजारो मराठा बांधवाची होती उपस्थिती
- अनेक राजकीय नेत्यांनी ही दिला पाठिंबा
सकल मराठा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राज्यभरातील मराठा समाजाला ३ (बी) मधून २ (ए) मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज अधिवेशनादरम्यान कोंडसकोप्प (ता. बेळगाव) येथे मराठा समाजाच्यावतीने भव्य आंदोलन छेडण्यात आले.
बेंगळूर गवीपूर मठाचे मंजुनाथ स्वामीजींच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित होता. काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आ. सतीश जारकी होळी, आर. व्ही. देशपांडे, सिद्धू सवदी, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, श्रीमंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी भाजप ओबीसी मोर्चा राज्य सचिव तथा मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले, राज्यात आर्थिक, शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून समाजाचा ३ (बी) मधून (२ A) मध्ये समावेश करण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. तेव्हा सरकारने आमची मागणी पूर्ण करून मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. तर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना मराठा समाजाची मागणी सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.
व्हिडिओ पहा 👇
आ. सतीश जारकीहोळी यांनी सदैव मराठा समाजासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर मंजुनाथ स्वामीजी यांनी, बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारावी,त्याचप्रमाणे मराठा समाजाला २ (ए) मध्ये आरक्षण द्यावे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी आम्ही आधीच बोललो आहोत. तेव्हा सरकारने यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.
या आंदोलनाला शामसुंदर गायकवाड, माजी आमदार मनोहर कडोलकर, नागेश मन्नोळकर, धनंजय जाधव, विनय कदम, प्रवीण पाटील आदींसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.
0 Comments