- जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांचे स्पष्टीकरण
बेळगाव / प्रतिनिधी
सौंदत्ती (ता. बेळगाव) येथील यल्लमा देवी डोंगरावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर हल्ला झाल्याची अफवा पसरवली जात आहे. सोशल मीडियावर ही खोटी बातमी व्हायरल होत असून भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी स्पष्ट केले.
आज बेळगाव शहरातील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. यल्लम्मा डोंगरावर अशी कोणतीही घटना घडली नसून सर्व काही सुरळीत आहे. यल्लामा मंदिरात सुरक्षेसाठी 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तेव्हा डोंगरावर येणाऱ्या भाविकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 Comments