विजयपूर / प्रतिनिधी
विजयपूर शहरातील नामांकित छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशन सोसायटी संचलित रवींद्रनाथ टागोर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा दिनाचे शनिवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राहुल जाधव तर उद्घाटक म्हणून क्रीडा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. जावेद जमादार उपस्थित होते.
प्रारंभी शालेय क्रीडा वर्धापन दिनाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले. त्यानंतर शपथविधी पार पडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोरंजन आणि योगाच्या कार्यक्रमाने पालकांची मने जिंकली.
यावेळी बोलताना डॉ. जावेद जमादार यांनी खेळातील सहभागाअभावी मुलांचा शारीरिक विकास खुंटला असून खेळांमध्ये भाग घेऊन भारताला आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये अधिकाधिक यश मिळवून देण्याची गरज व्यक्त केली.तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला महत्त्व देण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेवक राहुल जाधव यांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला आशिप शानवले, उद्योजक इरफान शानवले, छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष वसंत गायकवाड, अध्यक्ष शिवाजी गायकवाड, सचिव रिता गायकवाड, प्राचार्य फरीन खान व महाविद्यालयाचे प्राचार्य जयराम, विजयकुमार सारवाड उपस्थित होते. नंतर पाहुण्यांनी ॲथलेटिक आणि व्हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेतला.
0 Comments