विजयपूर / प्रतिनिधी

कितीही नवीन पक्ष निर्माण झाले तरी नरेंद्र मोदींच्या लाटे पुढे ते टिकू शकत नाहीत,असे मंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या नवीन पक्ष स्थापनेबाबत विजयपूर येथे प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

मी आणि जनार्दन रेड्डी एकाच पक्षात आहोत. पण त्यांच्याशी जवळचा संबंध नसल्यामुळे त्यांनी कधीही नवा पक्ष काढण्याबाबत किंवा पक्ष सोडण्याबाबत मला सांगितले नसल्याचेही मंत्री कारजोळ म्हणाले.

तर आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मंत्री करजोळ म्हणाले, आरक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ती पावले आमच्या सरकारने उचलली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने न्याय दिला जाईल, सर्व वर्गाला न्याय मिळेल असे त्यांनी सांगितले.