बेळगाव / प्रतिनिधी
भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य विनोद दोड्डण्णावर यांची राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग कम्युनिटी लीडर्स पॅनलच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदी नियुक्ती झालेले उत्तर कर्नाटकातील ते पहिलेच व्यक्ती आहेत. या पदाची जबाबदारी सांभाळताना ते अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांशी संबंधित विषयांवर कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाला मार्गदर्शन करणार आहेत.गेल्या १७ वर्षांपासून विनोद दोडण्णावर हे शैक्षणिक आणि वारसा संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.
बेनिवाड (हुक्केरी), हन्नीकेरी (बैलहोंगल) आणि इदारगुच्छी (ता. गडहिंग्लज, महाराष्ट्र) येथील अनेक प्राचीन मंदिरांच्या जिर्णोद्धारात त्यांनी गेल्या काही वर्षात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सन २०१८ मध्ये श्री गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक समिती, श्रवण बेळगोळच्या ५ राष्ट्रीय सचिवांपैकी ते एक होते. महामस्तकाभिषेक सोहळ्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. याशिवाय मा. राष्ट्रपती, मा. उपराष्ट्रपती,मा. पंतप्रधान, मा. केंद्रीय गृहमंत्री, मा. मुख्यमंत्री (कर्नाटक) यांची उपस्थिती लाभलेल्या ८ राष्ट्रीय परिषदांचेही त्यांनी यशस्वी आयोजन केले आहे. विनोद दोडण्णावर हे सध्या कर्नाटक प्रायव्हेट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
0 Comments