• आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शुभारंभ

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव ग्रामीण तारिहाळ गावात  बुधवारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते ६.५० कोटी रु. खर्चाच्या  विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपस्थित होते.

१.५० कोटी रु. खर्चाच्या श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी पायाभरणी, गावात काँक्रीटचे रस्ते बांधणे आणि ४ कोटी रुपये खर्चून पेव्हर्स घालणे. मास्तमर्डी क्रॉस ते तारिहाळ गावापर्यंत रस्ता रुंदीकरण व पथदीप बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.बडेकोळ मठाचे श्री सद्गुरु नागेंद्र स्वामी आणि अडविसिद्धेश्वर मठाचे श्री अडवेश्वर देवरु उपस्थित होते.


याप्रसंगी विधानपरिषद सदस्य  चन्नराज हट्टीहोळी, मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सूर्याजी पी जाधव, यल्लाप्पा गौंडाडकर, प्रमोद जाधव, नामदेव जोगन्नवर, नागप्‍पा तलवार, सविता कोळकार, गंगाव्वा पुजारी, गीता तलवार, संगीता भुमन्नावर, रामनाथ मुवकर, यांच्यासह  ग्रामस्थ उपस्थित होते.