बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव विभागाचे नूतन प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी आज सोमवारी आपला पदभार स्वीकारला. यावेळी शहरातील विविध संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना एम. जी. हिरेमठ म्हणाले, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि विश्वासामुळेच येथे पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी म्हणून माझ्या सेवेत तुम्ही मला दिलेले सहकार्य आणि प्रेम मी कधीही विसरणार नाही. मी जिल्हाधिकारी असताना संपूर्ण जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याने सर्व समस्या सक्षमपणे हाताळू शकलो. माझ्या सेवेच्या कालावधीत मला येथे पारदर्शक सेवा सेवा देण्याचा बहुमान दिल्याबद्दल त्यांनी सर्व संस्थांचे आभार मानले.
याप्रसंगी वन्यजीव, पर्यावरण विकास मंचाचे अध्यक्ष सुरेश उरबीनहट्टी, सरचिटणीस डॉ. डी.एन.मिसाळे, उपाध्यक्ष, श्रीशैल मठद , खजिनदार जगदीश मठद , संघटक सचिव प्रा. मारुती कदम, संचालक प्रा. शिवशंकर अब्बाई, मल्लेश रोट्टी, महेश माविनकट्टी, आणि जंगम समाजाचे नेते विरुपक्षया नीरलगीमठ, एन. बी.निर्वाणी, अशोक गोवेकर, स्नेह समाज सेवा संघाचे बसवराज गौडप्पगोला, महेश चिटगी, हालभावी , स्नेह बलगचे सोमशेखरैया हिरेमठ, रामतीर्थनगर येथील सुरेश यादव फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम जाधव, सुरेश यादव यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
0 Comments