विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील कन्नोळी गावानजीक टोलनाक्याजवळ टायर फुटल्याने ट्रकला आग लागली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ट्रक क्रमांक (केए - ५०,ए - ७०११) सिंदगीच्या दिशेने निघाला होता. यावेळी कन्नोळी टोलनाक्याजवळ अचानक ट्रकचा टायर फुटला. यावेळी प्रसंगावधान राखून वेळीच ट्रक बाहेर पडल्याने चालक बचावला. या घटनेनंतर स्थानिकांनी सिंदगी येथील अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी भेट देऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची नोंद सिंदगी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments