बेळगाव / प्रतिनिधी
एसकेएफ गोवा आयोजित रिव्हर मॅरेथॉन २०२२ ही स्पर्धा नुकतीच गोव्यात पार पडली . या स्पर्धेत धावणे या क्रीडा प्रकारात प्रवीण पिळणकर यांनी ५६ मिनीटात १० कि. मी. अंतर पार करण्याचा विक्रम केला. या कामगिरीबद्दल पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दीड तासात (९० मि.) १० कि.मी. अंतर धावण्याची ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. या स्पर्धेत बेळगाव मधुनही बरेच स्पर्धक सहभागी झाले होते.
0 Comments