• ७ हून अधिक अंगणवाडी सेविका गंभीर 
  • धारवाडनजीक पहाटेच्या सुमारास दुर्घटना  

हुबळी / वार्ताहर 

बेळगाव सुवर्ण विधानसौधकडे आंदोलनासाठी निघालेल्या अंगणवाडीसेविका आणि कार्यकर्त्यांच्या खासगी बसला भरधाव ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात  ७ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास धारवाडनजीक ही दुर्घटना घडली. अपघातानंतर जखमींना तात्काळ धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.