बेळगाव / प्रतिनिधी 

आंतर शाळा व युवा मिनिस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित स्केटिंग स्पर्धेत बेन्सन इंटरनॅशनल अकॅडमीचा विद्यार्थी सार्थक चव्हाण याने उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
केंद्रीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित स्केटिंग स्पर्धेत सार्थक चव्हाण यांनी 300 मी. व 500 मी. स्केटिंग शर्यतीमध्ये रौप्य पदक पटकविले आहे. सार्थक याला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल व योगेश यांचे मार्गदर्शन तसेच बेन्सन इंटरनॅशनल शाळेचे मुख्याध्यापक जो जोसीफिन गुंडी व क्रीडा शिक्षक सुरज बेलदार यांचे प्रोत्साहन लाभत आहे.