सुळगा (हिं.) / वार्ताहर
रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची कंग्राळी खुर्द येथे जाहीर सभा होणार आहे. कंग्राळी खुर्द येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रविवार २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. मराठी शाळेच्या पटांगणावर सभा होणार असून, हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन उभारणीसाठी भिडे गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत.
0 Comments