- अबकारी विभागाची कारवाई
- विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील घटना
विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील गोविंदपुर गावात बेकायदा गांजा साठवल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. पंचू बाबू बिरादर (रा. गोविंदपुर, ता. चडचण, जि.विजयपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार गोविंदपूर गावात अवैधरित्या गांजा साठवल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे धाड घालून केलेल्या कारवाई ३८,००० रु. किंमतीचा ९१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments