• नागेरहाळ गावातील काँक्रीट रस्त्यांच्या कामाचा आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते शुभारंभ 
सुळगा (हिं.) / वार्ताहर
मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाची कन्या या नात्याने कोरोना काळात सर्वांच्या कष्टाला आपण प्रतिसाद दिला आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन अडचणीत आलेल्या सर्वांची सेवा करण्यास मी सदैव तत्पर असल्याचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.बेळगाव ग्रामीण मतदार संघातील नागेरहाळ येथे आज शुक्रवारी  काँक्रीट रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. ४१ लाख रुपयांच्या अनुदानातून येथील रस्त्यांचा विकास केला जात आहे.
दरम्यान याचवेळी नागेरहाळ गावात महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी होऊन आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी  ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.मतदारसंघातील प्रत्येक गावात हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून गत साडेचार वर्षात ग्रामीण मतदार संघात राबवलेल्या विकास कामांची माहिती दिली जात आहे. मतदार संघातील  कोणतेही गाव  विकासापासून वंचित राहिले नसून गाव तसेच जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे  . हेब्बाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बसवनेप्पा पगडा,आडवैया कुलकर्णी, सिद्धप्पा गुंडूगोळ, नागय्या हवालदार, नागप्पा यल्लूर, यल्लाप्पा दोडवडी, रवी बंधी, गंगाधर यल्लूर, चंद्रप्पा अक्कन्नवर, नागप्पा दोडवडी, कुमार दोडवडी, सोनू नंदी, रुद्रप्पा चिन्नावर यांच्यासह गावातील जेष्ठ मंडळी, युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.