हुबळी / वार्ताहर
शहरात बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना हुबळी उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. अनंत थावरे आणि नागनाथ गायकवाड दोघेही (रा. महाराष्ट्र) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, हुबळी चाटनीमठ क्रॉसनजीक काहीजण गांजा विक्री करत असल्याची माहिती हुबळी उपनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे धाड घालून हुबळी उपनगर पोलिसांनी आरोपींना गांजासह अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 16 किलो 86 ग्रॅम गांजा आणि 80,340 रु. किंमतीची सेंट्रो कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हुबळी उपनगर पोलीस स्थानकात संबंधिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments