बेळगाव / प्रतिनिधी 

आरसीएच पोर्टलमधील असंख्य समस्यांमुळे अनेक कामांचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे कामगारांचे  आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविड नॉन एमटीआयएससाठी ज्यांना २,००० रु. देखील मिळाले नाहीत, अशांना संघ आधारित प्रोत्साहन देण्यासाठी  योग्यती कार्यवाही करावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज मंगळवारी सुवर्ण विधानसौध नजीक बस्तवाड येथे कर्नाटक राज्य संयुक्त अशा वर्कर्स असोसिएशन तर्फे आंदोलन करण्यात आले.


शहरातील आशा कामगारांचे अतिरिक्त काम आणि शहरी जीवनातील महागडे खर्च याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आदेश द्यावेत. तसेच आशा वर्कर्सना पदांनुसार मासिक मानधन व दरभत्ते निश्चित करावे, अशी मागणी अशा कार्यकर्त्यांनी यावेळी केली. या आंदोलनाला आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.