विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ संजीव शंकरगौडा पाटील हे 1314 मतांचा अंतराने विजयी झाले असल्याची घोषणा निवडणूक अधिकारी चिदानंद निंबाळ यांनी केली. निवडणूकेच्या रिंगणात तीन उमेदवार होते तर एकूण 4017 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 35 मते बाद ठरविण्यात आले. तर डॉ संजीव शंकरगौडा पाटील यांना 2579 मते मिळाली तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी सुरेश शिवलिंगप्पा अक्की यांना 1265 मते तर तिसरा उमेदवार प्रेमानंद सदाशिव हत्ती यांना 192 मते मिळाली असल्याचे निवडणूक अधिकारी चिदानंद निंबाळ यांनी कळविले आहे.
0 Comments