सुळगा (हिं.) / वार्ताहर
फक्त पुस्तकी ज्ञानाने सर्व काही साध्य करता येत नाही. बौद्धिक विकासासाठी शारीरिक तंदुरुस्ती देखील आवश्यक आहे. यासाठी अभ्यासासोबत क्रीडा उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्वच्छेने खेळात सहभागी होऊन कर्तृत्वाचे शिखर गाठावे असा मौलिक सल्ला आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बेनकनहळळी येथील बेन्सन्स इंटरनॅशनल ॲकॅडमीने आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या.
शैक्षणिक जीवनात उपलब्ध असलेल्या संधींचा प्रभावीपणे वापर केला तर जीवनातील सर्वोच्च ध्येय काढता येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी त्यांनी क्रीडा ध्वजारोहण करून क्रीडा स्पर्धांना चालना दिली. यावेळी प्राचार्य जोसेफिन गुंटी, शैक्षणिक संचालिका रचना गोर्ले यांच्यासह बेन्सन्सचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments