सुळगा (हिं.) / वार्ताहर 

सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज दि. 2 डिसेंबर रोजी गावात पहाटेपासूनच काकड आरती, होम हवन, गावांमधील सर्व मंदिरांना अभिषेक व कलश पूजन, सर्व मंदिरांमधील पूजा-अर्चा इत्यादी धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाले. 

यानंतर श्री महालक्ष्मी मंदिरात ओटी भरण्याचा व नैवेद्य देण्याचा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी देवस्की पंच कमिटीचे पदाधिकारी, ग्राम सुधारणा मंडळाचे पदाधिकारी, मंदिर जीर्णोद्धार बांधकाम कमिटी, मंदिर जीर्णोद्धार देणगी कमिटी, श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटी यांच्यासह, ग्रामस्थ महिला, लहान मुले, युवक मंडळे, ढोल पथके उपस्थित होते.

उद्या शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम, होमहवन विधी, जुन्या मंदिराच्या ठिकाणी श्री महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच सायंकाळी ठीक 6 वाजता, प्रतिष्ठापना झालेल्या ठिकाणी श्री लक्ष्मी देवीची महाआरती करून स्टार युवक मंडळ तर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी गावातील सर्व भक्तांनी लक्ष्मी गल्ली येथे हजर राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्की पंच कमिटी सुळगा (हिं.) यांच्यातर्फे करण्यात आली आहे.