- रोख रकमेसह दागिने लंपास
कोगनोळी / वार्ताहर
कोगनोळी येथील हालसिद्धनाथ नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन बंद घरात झालेल्या चोरीत रोख रकमेसह दागिने चोरट्यांनी लंपास केले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
हालसिद्धनाथ नगर येथे भर वस्तीत भोपाळ कोळेकर यांचे घर आहे. भोपाल कोळेकर हे मेंढपाळ असल्याने ते बकऱ्या घेऊन गेले होते. यावेळी आजी आक्कूबाई कोळेकर घरी एकट्याच होत्या. त्यांनी पुढील दरवाजाला कुलूप लावले होते हीच संधी साधून चोरट्यांनी कुलूप मोडून घरात प्रवेश केला आणि घरातील तिजोरी फोडून त्यामधील रोख रक्कम व दागिने लंपास केले. शिवाय घरातील इतर साहित्य विस्कटून चोरट्यांनी विस्कटून टाकले होते.
दरम्यान येथून जवळच असणाऱ्या विठ्ठल ठेंगले यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या ठिकाणी चोरट्याने दोन पोती भुईमूग शेंगा, एक पोते वाळलेली मिरची लंपास केली.
आज सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. भर वस्तीत चोरी झाल्याने हालसिद्धनाथ नगर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 Comments