बेळगाव / प्रतिनिधी
प्रगतिशील लेखक संघाच्या साप्ताहिक बैठकीत डॉ. पी. डी. कुलकर्णी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी डॉ. कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. 1942 घ्या आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन सेक्रेटरी पी. सी. जोशी हे भूमिगत असताना त्यांना आपण राहात असलेल्या वसतिगृहातील खोलीत आश्रय दिला होता. त्यावेळी जोशी यांनी मुका व बहिरा असल्याचे सोंग घेतले होते. पण नंतर त्यांना अटक झाली. डॉ. कुलकर्णी यांनी नंतर कम्युनिस्ट चळवळीस सर्वतोपरी मदत केली, असे आनंद मेणसे यांनी सांगितले.
ॲड. नागेश सातेरी, प्रा. दत्ता नाडगौडा, आनंद कानविंदे, कृष्णा शहापूरकर, ॲड. अजय सातेरी, ॲड. सतीश बांदिवडेकर, सागर मरगाण्णाचे, संदीप मुतगेकर, अर्जुन सागांवकर, महेश राऊत, शिवलिला मिसाळे, जमादार, भरत गावडे, अनिल आजगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments