- विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सीआयटीयूच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
प्रारंभी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी बहुसंख्येने बहुसंख्येने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी संघटनेचे जे. एम. जैनेखान यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागण्यांबद्दल माहिती दिली. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या ग्रॅज्युइटीसहित, प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्यासहित अन्य मागण्या पूर्ण करण्याची मागणी सरकारकडे केली.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा 68 हजार अंगणवाडी कार्यकर्त्यांसह बेंगळूर येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
0 Comments