• विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी शहरातील घटना

विजयपूर / वार्ताहर

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने गॅस सिलेंडरच्या गोडाऊनला आग लागली. विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी शहरात ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीच्या दुर्घटनेत संपूर्ण इमारत धुराच्या लोटात बुडाली होती.गॅस सिलिंडर साठवण केल्या जाणाऱ्या गोडाऊन मध्ये सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने गोडाऊनला आग लागली. यावेळी आग सर्वत्र पसरेल या भीतीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

सिंदगी पोलीस स्थानकाच्या मागे असलेल्या गोडाऊनमध्ये ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. यासाठी एकूण दोन अग्निशामक बंबांचा वापर करण्यात आला.