सुळगा (हिं.) / वार्ताहर 

राकसकोपनजीक भरधाव वेगात असलेल्या ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसून झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला.  विघ्नेश झंगरुचे (रा.सोनोली ता. बेळगाव) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार विघ्नेश राकसकोपहून ट्रॅक्टरने निघाले असता समोरून ट्रक येत असल्यामुळे साईड देण्यासाठी पुलावर ट्रॅक्टर बाजूला घेऊन थांबले . यावेळी भरधाव वेगात असलेल्या ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसली. या भीषण अपघातामुळे ट्रॅक्टर आणि ट्रक पुलाखाली कोसळले. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. विघ्नेशच्या मृत्यूमुळे सोनोली गावावर शोककळा पसरली आहे.