हुबळी / वार्ताहर 

ब्रेक निकामी झाल्याने परिवहन मंडळाची बस खड्ड्यात पडल्याची घटना  हुबळी येथील लोहियानगरमध्ये घडली. ही बस सीबीटीहून लोहियानगरकडे जात होती, लोहियानगरजवळ बसचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने  चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या टोईंग वाहनाने बस खड्ड्यातून उचलून बाहेर काढण्यात आली.