बेंगळूर दि. ४ नोव्हेंबर :
बेंगळूर येथील बैयप्पनहळ्ळी येथील सर एम. विश्वेश्वरय्या रेल्वे स्टेशनवर, काशी यात्रेसाठी सज्ज असणाऱ्या कर्नाटक - भारत गौरव काशी दर्शन विशेष रेल्वेची तयारीची धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांनी आज पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि चर्चा केली. या विशेष ट्रेनच्या सर्व जागांचे बुकींग आधीच झाले आहे. रेल्वेच्या डब्यांचे बाह्यभाग राज्याच्या महत्त्वाच्या मंदिरांच्या चित्रांनी आकर्षकपणे सजवलेले असून, 11 नोव्हेंबरला ही रेल्वे काशीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी धर्मादाय विभागाच्या आयुक्त रोहिणी सिंधूरी, दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे कमर्शियल मॅनेजर डॉ. अनूप दयानंद आणि रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments