- अतिवृष्टीने पीडित लोंढावासियांची मागणी
- जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले शासनाला निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
सन 2021-22 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खानापूर तालुक्याच्या लोंढा येथील अतिवृष्टीने बाधित कुटुंबांनी केली आहे. शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या लोंढा येथील बाजी त्यांची घरे अतिवृष्टीमुळे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
घरी कोसळल्यानंतर आम्हाला या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी विनंती आमदारांना केली आहे. सततच्या पूर परिस्थितीमुळे खूप त्रास होत आहे. सुदैवाने आमच्या जीवितास कोणतीही हानी झालेली नाही. तेव्हा सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले.
यावेळी रामा होसमनी,सत्येप्पा होसमनी, राजिया पठाण, मुनीर पठाण, सिंधु जटगेकर, लक्ष्मी तळवार, यल्लव्वा तम्मण्णावर आदि उपस्थित होते.
0 Comments