विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्ह्यातील तिकोटा शहर आणि आसपासच्या भागात गुरुवारी पहाटे 3 ते पहाटे 5 वाजेपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने अद्याप भूकंपाची अधिकृत माहिती दिलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या भूकंपांच्या मालिकेमुळे जनता भयभीत झाली आहे.
0 Comments