- संकेश्वर - निपाणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या धाब्यावरील प्रकार
- उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक अनिलकुमार नंदेश्वर यांनी संकेश्वर - निपाणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका धाब्यावर धाड घालून केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवलेली अंदाजे 34 किलो खसखस आणि अफूच्या बियांचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बियांची एकूण किंमत एक लाख 80 हजार रुपये इतकी आहे.
याप्रकरणी धाबा मालक गिरीधरसिंग किशोरसिंग पुरोहित याला अटक करून न्यायालय पुढे हजर करण्यात आले आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क निरीक्षक राजू गोंडे, शिवकुमार अम्मिनभावी यांच्यासह कर्मचारी अर्जुन अल्लापूर, दशरथ कुराडे, केदारी नलावडे, सागर बोरगमवे, बी.एस.ऊरबिनाट्टी आदींचा सहभाग होता.
0 Comments