- विकास कामांना मिळाला मुहूर्त
- आ.अनिल बेनके यांच्याहस्ते करण्यात आले भूमिपूजन
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विकासकामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. रस्ते, गटारी, पेव्हर्स बसविणे आदी विविध कामे आज सुरू करण्यात आली.होय, उत्तरचे आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुर, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्ता, गटार निर्मिती व पेव्हर बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन केले. जिल्हा पंचायत ते सरदार हायस्कूल क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला चालना देण्यात आली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता नाईक, ठेकेदार उदय शिवकुमार, किलारी आदी अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
एकंदरीत हे दर्जेदार काम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा जनतेला व्हावा, हीच सर्वांचीच इच्छा आहे.
0 Comments