• उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पटकाविला प्रथम क्रमांक 
  • राजगोळी संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी

 स्पर्धेतील विजेतेपदाच्या चषकासह शिवणगे
(ता.चंदगड ) गावचा कबड्डी संघ,
(फोटो सौजन्य :श्री.लक्ष्मण यादव,चंदगड )

चंदगड / लक्ष्मण यादव

श्री. कलमेश्वर कबड्डी  संघ कलिवडे व अशोकदादा कदम युवा मंच कलिवडे यांच्या संयुक्त विद्यमाने काल सोमवार दि. 7 नोव्हेंबर रोजी कलिवडे येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून  शिवणगे संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर राजगोळी संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तत्पूर्वी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अशोकदादा कदम यांनी प्रास्ताविक केले. यानंतर माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

 कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना
माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील,समवेत इतर मान्यवर 
(फोटो सौजन्य :श्री.लक्ष्मण यादव,चंदगड )

यावेळी बोलताना भरमुअण्णा पाटील म्हणाले,कॉम्पुटर,मोबाईलच्या युगात  मैदानी खेळ दुर्मिळ होत चालले आहेत.अशा स्पर्धा भरवून सुदृढ, निरोगी युवा पिढी घडवण्याचे काम अशोकदादा युवा मंच करत आहे. तालुक्यातून चांगले खेळाडू राज्य व देश पातळीवर चमकले पाहिजेत. त्यासाठी अशा स्पर्धा त्यांना पुढे घेवून जात असतात असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिष सदस्य सचिन बल्लाळ, तुकाराम गुरव, राजू तावडे, चंदगड अर्बन बँकेचे संचालक सुरेशदादा सातवणेकर, गोपाळ कुंभार, अनंत लोहार, गणपती पाटील, राम पाटील, जानबा चव्हाण, निवृत्ती कदम, रवळू पाटील, तसेच मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण यादव यांनी केले.