- सर्व संचालकांच्या एकमताने बिनविरोध निवड
नंदगड / वार्ताहर
नंदगड (ता. खानापूर) येथील खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार तथा डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या 17 वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले अरविंद पाटील यांनी तालुका मार्केटिंग सोसायटीच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
विद्यमान अध्यक्षा श्रीशैला मातोळळी यांनी दोन वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिल्याने या रिक्त पदासाठी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नावाची अन्य संचालकांनी एकमताने शिफारस केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व संचालकांनी नूतन अध्यक्ष अरविंद पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments