बैलहोंगल / वार्ताहर

चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरून उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. बेळगाव - बैलहोंगल मार्गावर संपगावीनजीक ही दुर्घटना घडली. मनोहर अण्णाप्पा मंडगावी (वय 72)  असे मृताचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी मनोहर यांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघाताची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाची नोंद बैलहोंगल पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.