•  विविध मागण्यांच्या पूर्ततेची मागणी 

बेळगाव / प्रतिनिधी 

भारतीय मुस्लिम सामाजिक आणि आर्थिक विकास मंचाच्या वतीने विविध मागणीच्या पूर्ततेचा आग्रह करून जिल्हाधिकारी नितीश पाटील यांना  निवेदन देण्यात आले .

बेळगाव मुस्लिम फोरमचे अध्यक्ष ऍडआय. ए. मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन निवेदने सादर करण्यात आली .

निवेदन सादर केल्यानंतर आपली मराठीला माहिती देताना ऍड . आय ए मुल्ला यांनी सांगितले कि , आज मुस्लिम समाजाच्या नेत्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत . आमच्या मुस्लिम जमातीची लोकसंख्या जास्त आहे . आम्हाला २ बी मध्ये घालण्यात आले आहे . आम्ही समाजबांधव  सामाजिक , आर्थिक ,आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेले आहोत . त्यामुळे आमचे आरक्षण 4 % वरून 8 % इतकं आरक्षण वाढवावे .त्याचप्रमाणे कणबर्गी रोडवरील रामतीर्थनगरात , 9 घरे विनानोटीस पाडण्यात आली . त्यापैकी २ घरे ही माजी सैनिकांची होती . घरे हटवल्यानंतर किमती सामान देखील ते घेऊन गेले . महानगर पालिकेच्या व्याप्तीत इतर अनेक अतिक्रमणे आहेत ती का हटवत नाहीत असा प्रश्न त्यांनी यावेळी केला . त्याचप्रमाणे , किटवाड धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनास जाऊन बुडालेल्या बेळगाव शहरातील ४ मुस्लिम तरुणींच्या कुटुंबियांना सरकारने सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी मुस्लिम फोरमचे सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते उपस्थित होते .