चंदगड / लक्ष्मण यादव
श्री कल्मेश्वर कबड्डी संघ कलिवडे व मा.श्री.अशोकदादा कदम युवा मंच कलिवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी ठीक 6 वा. भव्य खुली कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रु. 11,001 /- चे बक्षीस श्री. शिवाजीराव पाटील (भाजप, प्रदेश कार्यकारणी सदस्य) व श्री. अनंत पाटील (आराध्या, कलेक्शन्स पाटणे फाटा) यांचेकडून , दुसऱ्या क्रमांकासाठी रु.7,000/- चे बक्षीस श्री. सचिन बल्लाळ (जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर) यांचेकडून तर तृतीय क्रमांक रु. 5001/- चे बक्षीस श्री. तुकाराम गुरव (वनविभाग) व श्री. राजु तावडे (कल्मेश्वर किराणा स्टोअर्स) यांचेकडून देण्यात येणार आहे. याशिवाय वरील सर्व बक्षिसांना चषक श्री. सुहास तुकाराम गावडे यांचेकडून तर वैयक्तिक बक्षिसे शिस्तबद्ध संघ - चषक : श्री अमृत देसाई यांचेकडून, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड : चषक श्री. अमोल गोपाळ भोगुलकर (चंदगड तालुका युवा मोर्चा सदस्य) यांचेकडून देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी रु. 701/- प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. तरी हौशी कबड्डी संघाने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अशोक कदम यांनी केले आहे.
0 Comments