सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव तालुक्यात शनिवार सायंकाळ पासून तुळशी विवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (हिं.) गावातही आज पहिल्या दिवशी तुळशी विवाहाची लगबग दिसून आली.

हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्कंद पुराणात आर्थिक महिन्यात तुळशी पूजेचे महत्त्व विशद करण्यात आले आहे.



आर्थिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा, म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या चार दिवसात घरोघरी तुळशी विवाह केले जातात. हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात.

सुळगा (हिं.) येथे शनिवार सायंकाळपासून तुळशी विवाहास सुरुवात झाली होती. यासाठी अगोदरच तुळशी रंगरंगोटी करून सजविण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी मंगलाष्टका ऐकू येत होत्या.तुळशी विवाहानंतर प्रसाद म्हणून चिरमुरे-बतासे वाटण्यात आले. आजपासून सुरू झालेला तुळशी विवाह सोमवार पर्यंत चालणार आहे.