सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांच्या अपेक्षेपलीकडे जाऊन ताकदीने काम केले याबरोबरच महिला सक्षमीकरणालाही प्राधान्य देऊन ते प्रत्यक्षात आणल्याचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हलगा गावात आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी उपस्थित गावातील महिला आणि ग्रामस्थांनी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.