मृत : आकाश ऐवळे
बेळगाव / बसवराज हिरेमठ

कृष्णा नदीत पोहण्यास गेलेला युवक बुडाल्याची  घटना स्वामी समर्थ घाट येथे रविवार दि.13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वा. सुमारास घडली.आकाश ऐवळे असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. घटनेनंतर  तात्काळ अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  यांत्रिक बोटीसह घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरु केली. मात्र मृतदेह शोधण्यात अपयश आले. रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली. यानंतर पुन्हा सकाळी ६ वा. शोध मोहीम सुरू करण्यात आली असता आकाशचा मृतदेह आढळून आला.

या शोध मोहिमेत अग्निशामक दल, (HERF) रेस्क्यू टीम, विश्वसेवा फाउंडेशन, स्पेशल रेस्क्यू फोर्स यांचा सहभाग होता.