• आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन 

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील  रस्त्यांच्या विकासासाठी  45 लाख रु. अनुदान मंजूर झाले आहे. आज महालक्ष्मी नगर,बेनकनहळ्ळी येथे स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.


रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला असून बहुतांश रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. पुढील विकासासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संभाजी खोत, मोहन सांबरेकर, यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.