विजयपूर / वार्ताहर 

शौचालय जागेच्या वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीचा निर्घृण खून केला. विजापूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील किलारहट्टी गावात ही घटना घडली.

मरगू पांड्रे (वय 55) असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. बिरू, मलप्पा यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने खून केला आणि ते फरार झाल्याचा आरोप पांड्रे कुटुंबीयांनी केला आहे. तसेच शौचालयाच्या जागेच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेक दिवस भांडण होते.  पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. या प्रकरणी बबलेश्वर पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे.