काकती / वार्ताहर
गावातील लोकांच्या जमिनी कवडी मोलाने घेऊन देखील हिंडाल्को कंपनीने येथील तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत याबाबत यमुनापूर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कंपनीचे दूषित पाणी येथील शेत शिवारात जात आहे. प्रदूषणामुळे नागरिक तसेच जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून हिंडाल्को कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी देखील याकडे कानाडोळा केला आहे.
या संदर्भात यमुनापूर ग्रामस्थांनी बैठक घेतली. या बैठकीत कंपनीच्या विरोधात आवाज उठवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
0 Comments